अरेबा परेबा आणि इतर कथा – उदय प्रकाश
अरेबा परेबा आणि इतर कथा – उदय प्रकाश
मराठी अनुवाद – जयप्रकाश सावंत
दुःख माणसाला मोठं करतं. दुःख माणसाला बोलतं करतं. अन,
समाजाशी त्याची एकरूपता साधायलाही मदत करणारं दुःखच असतं. लेखकांचेही असेच असते.
दुःख सोसल्याशिवाय त्यांना फार काही लिहिता येतच नाही. उदय प्रकाशही असेच लेखक
आहेत. त्यांनीही आयुष्यात अनंत दुःखं भोगली आहेत. तुमच्या माझ्यासारखेच सारे दुःख
उदय यांच्या अंतर्मनात खोलवर साठत राहिली आहेत. आतल्या आत केवळ दुःख आणि दुःखच ते
आयुष्यात भोगत राहिलेत, तीच दुःखं आपल्या कथांमधून त्यांनी अरेबा परेबा आणि इतर
कथा या आपल्या पुस्तकांत मांडली आहे. या पुस्तकात डबी, नेलकटर, अपराध, अरेबा परेबा
अशा अनेक कथांतून त्यांनी वाचकांच्या काळजाला हात घातला आहे.
बालपण -
उदय बारा-तेरा वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या आईचे कॅन्सरने निधन झालं. दुःखांना कवेत घेण्याची सुरूवात तर त्यांच्या लहानपणापासूनच झाली. या कथासंग्रहातील नेलकटर,अपराध,साह्यकर्ता, डबी या कथांमधून त्यांनी आपल्याच खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना कथेच्या स्वरूपात पेश केले आहे. अख्ख्या जगात जी सगळ्यात चांगली होती, ती आई मरून गेली, हे उदय प्रकाश यांच्या कोवळ्या वयातच भोगावं लागलं. मनाला छिन्नविछिन्न करणारा अनुभव त्यांनी आपल्य नेलकटर कथेतून दिला आहे. साह्यकर्ता या कथेतही उदय प्रकाश यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूला जवळून बघण्याची कथा सांगितली आहे. उदय यांच्या वास्तविक आयुष्यात त्यांच्या आईच्या जन्माच्यानंतर पाचच वर्षात त्यांचा साह्यकर्ताचेही छत्र कॅन्सरमुळेच डोक्यावरून नष्ट झाले आहे. यानंतर उदय प्रकाश या लेखकाने सर्वस्पर्शी अन गहन असे दुःख भोगले. एकाकीपणा, असुरक्षितता, भवितव्याच्या भीतीची जाणीव या सर्वच त्यांच्या आयुष्याला हादरवणाऱ्या गोष्टी त्यांनी आपल्या कथांत चित्तारल्या आहेत.
आशयगर्भ लेखन - चिंतनशील कथा लेखन फारच क्वचितच वाचायला
मिळते. मराठीत मला वाटतं वि.स.खांडेकरांच्या कादंबरी याच धाटणीतल्या आहेत. अगदी
त्यांच्याच जवळ जाणारं लेखन उदय प्रकाश यांचेही म्हणायला हवे. नेलकटर या त्यांच्या
कथेत त्यांची आई मृत्यूशय्येवर आहे, याची जाणीव त्या लहानग्या जीवालाही होती. तो
आपल्या आईचे नखे घासून नितळ करून देण्यात गुंग आहे. त्याही परिस्थितीत जेव्हा उदय
आईचा हात हातात घेतात, तेव्हा तो त्यांना अगदी हलका भासतो. यावर बोलताना ते
लिहितात, कुठं गेल होतं, तिचं सारं वजन, बहुधा हा जीवनाचा भार असावा. पृथ्वीचा
चुंबक ज्याला आपल्या दिशेने ओढत असतो. आईपाशी आता खूप कमी उरला होता हा भार.
पृथ्वीने बहुदा तिची ओढ कमी करत आणली होती.
गंभीर निरीक्षण –
वास्तववादाचं चित्रण –
उदय प्रकाश यांना स्वप्नांची दुनिया
अजिबात रंगवायची नाही. त्यासाठी त्यांनी कलम जवळ केली नाही. त्यांना भूलवणाऱ्या आभासांच्यापेक्षा चटके
देणारे, सोसायला लावणारे पण निखळ सत्य असणारे भयंकर क्रूर वास्तवातच लिहायला पसंत
पडले असल्याचे या कथासंग्रहाच्या प्रत्येक पानापानातून जाणवत राहते. सुखाच्या
रंगीत अन गंधीत करणाऱ्या मंद झुळुकेपेक्षा दाहक वास्तवाच्या तप्त सळईवरचे शब्द
निखारे त्यांना पानावर सजवण्यात धन्यता वाटली आहे. मानवी स्वभावाचे एक वैशिष्ट्य
म्हणजे इतरांचे सुख त्याला फारसे आपलंपणाची जाणीव करून देणार नाही. मात्र, त्याला
इतरांची दुःखी, करूणामय कथा थेट मनाला भिडते. अशा दुःखांना, व्यथांना उदय प्रकाश
वाचकांपुढे प्रज्वलित करतात. जगातल्या प्रत्येक कोमल, पवित्र, निष्कवच आणि
सुंदर जीवन गंभीर धोक्याच्या छायेत आहे. आपल्या काळाच्या प्रत्येक भिंतीवर रक्ताचे
शिंतोडे आहेत. अशा वास्तवाकडे व या व्यवस्थेत अंतर्भूत असलेल्या अन्यायाकडे
डोळेझाक करत स्वानंदात रमणं उदय प्रकाश यांना अशक्य आहे.
अधिक थोडेसे –
उदय प्रकाश यांच्या कथांचाच पहिला कथासंग्रहदेखील जयप्रकाश सावंत यांनीच अनुवादित केला आहे. मराठी वाचकवर्गाकडून आतापर्यंत प्रकाश यांच्या कथांना चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. यानिमित्ताने आतापर्यंत केवळ इंग्रजी, हिंदी साहित्यापुरतेच मर्यादित असेलेले प्रकाशक अनुवादातून मराठीतही आपली पुस्तके आणून लागली आहेत. याच कारणामुळे मराठी साहित्यपसारा विस्तारायला मदत होत आहे. नव्या पिढीला आकर्षित करेल असे साहित्य निर्माण होऊ लागल्याने वाचनाची गोडी त्यांच्यातही निर्माण होताना दिसते आहे.
रूपरेखा – अरेबा परेबामध्ये डबी, नेलकटर, अपराध,
साह्यकर्ता, अभिनय, नोकरी, छत्र्या, छपन्न तोळ्यांचा कमरबंद, अरेबा-परेबा, पॉल
गॉमरांची स्कूटर, दिल्ली या कथांचा समावेश आहे. त्यांच्या
कथांमध्ये वाचकांनी रममाण व्हावेच.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा